शालेय स्पर्धा परीक्षा माहिती
___
By Shashi Biradar
Information
माझ्या सर्व पालक व विद्यार्थी मित्रांनो,
आपला पाल्य इयत्ता 1 ली ते 12 वी च्या वर्गात शिकत असतांना राज्यात शालेय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये पाचवी – आठवीच्या टप्प्यावर होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या सरकारी परीक्षांच्याच जोडीने अनेक स्थानिक स्पर्धा परीक्षांचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा, म्हणून त्यांना शालेय पातळीवरील अशा परीक्षांची तयारी करण्यासाठी पालकांकडूनही प्रोत्साहन दिले जाते. हीच बाब विचारात घेऊन राज्यातील बहुतेक शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर विविध शालेय स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते,
मुलांच्या शालेय जीवनापासून या परीक्षांना अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षांना प्रत्येक विद्यार्थी प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. यातून पालकांनी / शिक्षकांनी यश अपयश न पाहता विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते याचा विचार केला पाहिजे. या परीक्षांच्या माध्यमातून खालील फायदे होतात.
शालेय स्पर्धा परीक्षेचे फायदे
उदा.1. वेळेचे नियोजन.
- उत्तर देण्याची पद्धत व विचारांची अचूकता.
- स्मरणशक्ती वाढते.
- विचारांची क्षमता वाढते.
- परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढतो.
- चाकोरी बाहेरचा विचार करणे.
- यश, अपयश पचविण्याची ताकत निर्माण होते.
- विविध विषयांचे वाचन वाढते.
- विद्यार्थ्याचा कल लक्षात येतो.
- परीक्षेबद्दलची भीती कमी होते.
या आणि अशा अनेक गोष्टींचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांना होतो, आणि पालकांना ही होतो.
त्यामुळे या सर्व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची माहिती आपल्या पर्यत पोहचावी या उद्धेशाने वेगवेगळ्या माध्यमातून हि माहिती संकलित करून एकत्रितपणे येथे देत आहे.
निश्चितच आपण या माहितीचा उपयोग आपल्या पाल्याच्या सर्वांगीण स्पर्धात्मक विकासासाठी करणार याची मला खात्री आहे…… सर्वांना मनपूर्वक शुभेछासह..
अ.क्र. | परीक्षेचे नाव | वर्ग | Website link | ||
1 | अक्षरगंगा परीक्षा | 1 ली ते 8 वी | |||
2 | महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा | 2 री ते 7 वी | https://www.mtsjalgaon.co.in/ | ||
3 | पूर्व उच्च शिष्यवृत्ती परीक्षा | इयत्ता 5 वी | https://www.mscepune.in/ | ||
4 | |||||