HAPPY GUDIPADVA
गुढीपाडवा संपूर्ण माहिती इतिहास
___
By Shashi Biradar
गुढीपाडवा संपूर्ण माहिती इतिहास
गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मित्रांनो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा दिवस खुप आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो हा सण आपण का साजरा करतो या सणाची हिंदू धर्मात विशेष काय महत्त्व आहे या सणाचे वैज्ञानिक महत्त्व आपण जाणून घेणार आहोत.
गुढीपाडवा सण का साजरा करतो
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदू चे नव वर्ष या दिवशी सुरू होते नववर्षाची स्वागत करण्याची पद्धत म्हणजे गुढी पाडवा
प्रत्येक जण आपापल्या घरांमध्ये उंच काठी रवतो. या उंच काठीला गुढी असे म्हणतात. हिंदू धर्म शास्त्र मानते की गुढी हे विजयाचे प्रतीक आहे समृद्धीचे प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढी असते त्या घरातील लोकांना विजय मिळतो अनेक गोष्टीवर म्हणजेच राग असेल क्रोध असेल किंवा आसुरी वृत्ती असेल या दुर्गुण वरती विजय मिळतो या विजयाचे हे प्रतीक आहे.गुढीपाडवा संपूर्ण माहिती इतिहास
आपण जे काम करतो कष्ट करतो त्यातून घरामध्ये सुख, समृद्धी यावी यासाठीचे प्रतीक म्हणजे गुढी असते.
मित्रांनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे. या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा होय. म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात. अनेक शुभ कार्यांना या दिवशी सुरुवात केली जाते.

मित्रांनो गुढी उभारण्याची सुरुवात केव्हापासून झाली.
आपण महाभारत काळामध्ये पाहिले तर उपरिचर नावाचा राजा होता आणि त्याला इंद्र देवाने एक उ काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा या आदराप्रित्यर्थ उपरिचर राजाने आपल्या महलासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली. आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली तर हा दुसरा दिवस म्हणजे हिंदू च्या नव वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा होय. त्या राजाने रोवलेली गाठी पाहून इतर राज्यांनीही आपापल्यापरीने काठी रोवून त्या काठीवर वस्त्र लावले त्या काठीला सजवले त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशाप्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि गुढीपाडवा सणाची सुरुवात झाली
गुढीपाडवा संपूर्ण माहिती इतिहास याबाबतच्या अजूनही काही रंजक कथा सांगितल्या जातात त्या खालील प्रमाणे आहे.
प्रभू श्री रामचंद्रांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. देवालासुद्धा वनवास भोगावा लागला या काळात त्यांनी लंकाधिपती रावण व इतर राक्षसांचा पराभव केला आणि ते जेव्हा आपल्या अयोध्या नगरीत चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून परतले तेव्हा अयोध्येतील सर्व प्रजेने मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले आणि त्या वेळी सर्व अयोध्येत प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढ्या उभारण्यात आल्या म्हणून गुढी हे विजयाचे प्रतीक आहे . प्रभू रामचंद्रांनी या संकटावरती जो विजय मिळवला याचे प्रतीक म्हणजे ही गुढी. म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरासमोर गुढी उभी करावी असा संकल्प करण्यात आला.
दुसरी एक कथा गुढीपाडव्याच्या निमित्ताने ऐकण्यात येते एक काळ असा होता की भारतावर शकाची राज्य होते शक हे अत्यंत दुष्ट होते या शकानी उत्पाद माजवला होता आणि याचा पराभव करण्यासाठी या एक कुंभाराचा मुलगा होता तो शालिवाहन तर या शालिवाहन ने तब्बल 6000 मातीचे पुतळे बनवले सैनिकांचे पुतळे आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकाच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला. तू जो विजय त्यांनी मिळवला त्या विजयाच्या प्रित्यर्थ सुद्धा गुढी उभारली जाते ही एक आख्यायिका आहे.

गुढी उभारण्याचे वैज्ञानिक कारण
मित्रांनो आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे ही गुढी पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने व फुले यांच्यात थोडा गूळ ओवा मीठ हिंग गूळ हे पदार्थ टाकून जे मिश्रण तयार होते त्याचे या दिवशी सेवन केले जाते वैज्ञानिक दृष्ट्या जर पाहिले तर हे सर्व मिश्रण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता कमी होत असते. आता जो ऋतु आहे तो उन्हाळा आहे. आणि या उन्हाळ्याच्या ऋतूत तापमान प्रचंड वाढलेली असते त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेच्या जास्त त्रास होतो तो जास्त त्रास ऊस कमी व्हावा म्हणून याची सेवन केले. तसेच या मिश्रणापासून पित्त कमी होते व त्वचा रोग कमी होण्यास मदत होते पचनक्रिया सुधारते अशा या बहुगुणी औषधी वनस्पतीचे फुले पाणी सेवन केले जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळ करताना पिसोळा पायाखाली का घेतला जातो
या दिवशी अंघोळ करताना पिसोळा गवत पायाखाली घेऊन आंघोळ केली जाते. याचे असे कारण सांगितले जाते की आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेतीमध्ये पीसोळा नावाचे तण त्या काळात भरपूर प्रमाणात येत होते यामुळे पिकाचे प्रचंड नुकसान होत होते त्यावर उपाय म्हणून हे तण नष्ट करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिवशी हे तण पायाखाली घेऊन आंघोळ करण्याची प्रथा निर्माण झाली तेव्हापासून आजपर्यंत आपण हे तर घेऊन या दिवशी अंघोळ करतो. त्यामुळे या तणाचे प्रमाण कमी झाले.
या पद्धतीने जे सण-उत्सव आहे याच्या पाठीमागे काही वैज्ञानिक व धार्मिक कारण आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.
सर्वांना गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक मनःपूर्वक शुभेच्छा……
हे ही जाणून घ्या होळी का साजरी केली जाते click here
online NMMS EXAM class 8 CLICK HERE